जळगाव, १५ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयात आज पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
आमदार खडसे यांनी अब्रूनुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, यांची सविस्तर माहिती न्यायालयात सादर केली, न्यायालयाने खडसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. या खटल्याची आता पुढची सुनावणी होणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खडसे यांना बदनामीकारक शब्द वापरले, असे या याचिकेत म्हटले आहे.
यात खडसे यांचा काहीही संबंध नसताना हे बदनामीकारक शब्द वापरुन त्यांची बदमानी व अब्रूनुकसानी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी फौजदारी व अब्रूनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला. या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर.वाय.खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. खडसे यांच्यातर्फे अॅड. अतुल सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर