थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

11

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: भाजपला रामराम ठोकणारे एकनाथ खडसे आज दुपारी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या ११ दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आणखी कोण कोण खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं सांगत भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्यांवर आरोप केले आहेत. मला मंत्रीपद गेल्याचा नाही, तर माझं जीवन उद्धस्त करण्याचा जो प्रयत्न केला गेला ते सर्वात वाईट होतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी