मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२ : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा काल पार पडला. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानावर १ लाख २५ हजार तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६५ हजार शिवसैनिक आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते.
याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. पण त्यांच्या सभेला जवळपास ९७ हजार कार्यकर्ते जमा झालेले. दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही यावेळी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली.
गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. अवघ्या राज्याचं लक्ष उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्याकडे लागलं होतं. अखेर बुधवारी बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड