एकनाथ शिंदे असणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई, 30 जून 2022: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला बहुमत दिलं नाही. निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप-शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली होती, मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. यादरम्यान शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे विचारही रोखून धरले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. यापूर्वी असे कधीच घडले नव्हतं. बाळासाहेबांनी नेहमीच दाऊदला विरोध केला, मात्र उद्धव सरकारमधील एक मंत्री दाऊदशी संबंधित आहे. तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं नाही. हा बाळासाहेबांचा अपमान आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा