मुंबई, ७ सप्टेंबर २०२२:दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दोन्ही गटात दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर मेळावा घेण्यासा रस्सीखेच सुरु आहे. महानगरपालिकेच्या म्हणाण्या नुसार आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. या तत्वानुसार मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने आधीच अर्ज केला होता. या ठिकाणी शिंदे गट मागे पडला. मात्र आता हे सगळे नियम धाब्यावर बसून एकनाथ शिंदेंनी ‘आम्हाला नही, तर तुम्हालाही नाही’ या जीद्दिने वेगळीच चाल खेळली आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्था’ वर मेळावा येऊ नये आणि ठाकरेंची परंपरा खंडित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आता शिवाजी पार्क मैदानच गोटवण्याची तयारी करत असल्याचे समजत आहे, दोन्ही गटांनी मैदानासाठी दावा केल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्कसह मुंबईतील सर्व मैदान गोटवण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास उद्धव ठाकरेंना मेळावाच घेता येणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड