उद्धव आणि आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंची ऍलर्जी, गिरीश महाजन यांची टीका

14

नाशिक,१५ ऑगस्ट २०२३ : एक वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली. आपल्या समर्थक आमदारांसह त्यांचा गट घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हापासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्यात येत आहे. आजवर राजकीय टीकाटिप्पणी केली जात होती. आता ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणाच्या कारणावरून टीका करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. तर त्यांच्या आजारपणावरून देखील आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरून भाजप नेते,मंत्री गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली आहे.

गिरीष महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अत्यंत अस्वस्थ आहेत. या दोघांनाही शिंदे यांची ऍलर्जी आहे. त्यांना आता दिवसा सुद्धा स्वप्न पडायला लागली आहेत,अशी टीका महाजन यांनी केली. याच्या आधीच केंद्रीय नेतृत्वाने देखील स्पष्ट केले आहे की २०२४ च्या निवडणूका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वातच लढवणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्ट केले आहे,असेही गिरीष महाजन म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर