‘त्या’ प्रकरणी एकता कपूरने सोडले मौन; म्हणाली…

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२२ : सध्या मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही चित्रपटांमधील कंटेंटवरुन टिकांचे सामने सुरू आहेत. त्यातच एकता कपूर हिला देखील गेल्या काही दिवसांपासून टिकांचा सामना करावा लागतो आहे. रागिनी एमएमएस, बेकाबू, गंदी बात या तिच्या सिरीज आणि चित्रपटांना न्यायालयाने परवानगी दिली नाही. आॅल्ट बालाजी या ओटीपी प्लॅटफॉर्मवर अक्षेपार्ह कंटेंट दाखवल्यामुळे निर्माती एकता कपूरला फटकारले आहे.

  • तुम करो तो …

चित्रपट पाहणारा वर्ग जास्त करुन तरुण पिढी आहे. त्यामुळे चित्रपटातून तरुण पिढीला बिघडवण्याचे काम केले जाते, असे कारण देत कोर्टाने एकता कपूरचे चित्रपट प्रदर्शित होण्यास बंधने घातली आहेत. या घटनेवरच एकता कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टवरून एकता कपूरने निर्माता दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये एकता कपूर लिहिते- ‘तुम करो तो लस्ट स्टोरीज और हम करे तो गंदी बात’.

तिच्या या वक्तव्यानंतर करण जोहर आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढेच नाही तर त्याचसोबत ‘दुटप्पीपणा’ असा हॅशटॅग तिने या पोस्टमध्ये लिहिला आहे. २०२० मध्ये नेटफ्लिक्स या ओटीपी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज’ ही अॅथॉलॉजी फिल्म प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी त्यांच्या कथा दाखवल्या आहेत. यातीलच एक कथा करण जोहरने दिग्दर्शित केली होती. या चारही कथांमध्ये महिलांचा कमकुवतपणा दाखवण्यात आला होता. त्यामुळे एकता कपूरने करण जोहरच्या दिग्दर्शित कहाणीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

एकता कपूर हिच्या XXX या चित्रपटावरून कोर्टाने एकता कपूरला सुनावला आहे. तुम्ही या देशाच्या युवा पिढीचा मेंदू विचलित करत आहात. ओटीटी वरील हा कंटेंट सर्वांसाठी उपलब्ध असतो. तुम्ही लोकांना कोणता पर्याय देत आहात? असा सवाल कोर्टाने एकता कपूर हिला केला. त्याचप्रमाणे तिच्या सिरीज वर निर्बंध ही आणले. या सिरीजमधील सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह दृश्य दाखवण्याच्या घटनेवर आरोपही करण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा