“ज्यांच्यासाठी जगलो, तेच छळतात!” ज्येष्ठांनो, मदतीसाठी थेट ‘या’ नंबरवर फोन करा!

वयोमानानुसार येणाऱ्या अडचणी, कौटुंबिक छळ आणि एकटेपणाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठांसाठी आता एक आशेचा किरण उपलब्ध झाला आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने सुरू केलेली टोल-फ्री हेल्पलाइन ‘एल्डर लाइन १४५६७’ ज्येष्ठांना मदतीचा हात देत आहे.

ही हेल्पलाइन सेवा महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासून कार्यरत आहे. आरोग्यविषयक समस्या, कायदेशीर सल्ला, पेन्शन, सरकारी योजना, भावनिक आधार आणि कुटुंबाकडून होणारा छळ यांसारख्या अनेक प्रश्नांवर या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन केले जाते. दररोज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ही सेवा उपलब्ध असून, समुपदेशक, पोलिस आणि कायदेतज्ज्ञांच्या मदतीने अनेक प्रकरणे यशस्वीरीत्या सोडवली आहेत. त्यामुळे, ज्येष्ठांनो, एकटेपणा किंवा अडचणी आल्यास लगेच १४५६७ या क्रमांकावर फोन करा आणि मदतीचा हात घ्या!

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले