मुंबई, ४ ऑक्टोबर २०२२ : शिवसेनेतील बंडांनंतर शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटातील माणसांनी शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावर हक्क सांगितला आहे. आता निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे. ठाकरेंना आपली बाजू मांडण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळ देण्यात आलीय. पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाणाचा पेच सोडवायचा असल्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे असे सांगून निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.
त्यामुळे ठाकरे गटाला एकीकडे दसरा आणि दुसरीकडे धनुष्यबाणावर पुन्हा हक्क मिळवणे या दोन्ही गोष्टींसाठी उद्धव ठाकरेंना मेहनत घ्यावी लागणार आहे.
आमचीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाने केल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुद्धा दावे-प्रतिदावे करत आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांत पक्ष आणि चिन्हावरून जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. उद्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीकेसीवर शिंदे गटाचा तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा जोरदार सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटांत दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे दसरा मेळावा; तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी शिवसेनेला दसऱ्याच्या दिवशी प्रचंड प्रयत्न करावा लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड