बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यातील सरपंच-उपसरपंचपदाची निवड १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित

पुणे, ९ फेब्रुवरी २०२१: पुणे जिल्ह्यातील एकूण ७४६ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या सभेमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ९ आणि १० फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंदाची निवड होणार आहे. मात्र, बारामती, शिरूर आणि खेड तालुक्यातील सरपंच-उपसरपंचपदाची निवड १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. संरपचपादाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने या तीनही तालुक्यातील निवडींना स्थगिती देण्यात आली आहे.

राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भोसे, बारामती तालुक्यातील निंबुत आणि शिरुर तालुक्यातील शिक्रापूर या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 9 फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान आज पासून हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौड, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर या ९ तालुक्यांमधील ग्रामपंचायतींमधील सरपंच-उपसरपंचपदाची निवड होणार आहे. ही निवड ९ आणि १० तारखेला करण्याचे आदेश देण्यात अल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा