मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२ : बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक २०२२ चा काल रात्री निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शरद पवार आशिष शेलार गटाचे अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे संदीप पाटील यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत पवार- शेलार पॅनलचे अमोल काळे यांचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत अमोल काळे यांनी १८१ मते मिळवत विजय मिळवला आहे. तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली आहेत. व अमोल काळे यांचा २३ मताने विजय. वानखेडे स्टेडियमर गुरुवारी झालेल्या निवडणुकीतील मतदानाला चांगला प्रतिसाद लाभला ३८० पैकी ३४३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण ३८० मतदार आहेत. त्यामध्ये मैदान क्लब २११, ऑफिस क्लब ७८ , स्कूल कॉलेज क्लब , ४० आणि माजी कसोटीवर ५१ असे मतदार आहेत.
या पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर ,आणि निलेश भोसले हे पवार शेलार पॅनल कडून निवडणुकीच्या रिंगणात होते.
दरम्यान आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्या जागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव