इंदापूर, दि.७ ऑक्टोबर २०२० : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटक्या-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अशोक विठ्ठलराव वणवे यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच संघटनमंत्री महाराष्ट्र राज्य विजय पुराणिक , आमदार नरेंद्र पवार, भटक्या-विमुक्त आघाडीचे अध्यक्ष तसेच भटक्या विमुक्तीचे सहसंयोजक महाराष्ट्र प्रदेश संतोष आव्हाड,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीत वणवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सर्वांनी अशोक वणवे यांचे अभिनंदन केले.
यापूर्वी वणवे यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ,सरचिटणीस म्हणून काम केले आहे त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना राज्यपातळीवरील संधी देण्यात आली आहे. या निवडीमध्ये संतोष आव्हाड यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलेले आहे. भटकीे-विमुक्त जाती-जमातींना न्याय देण्याचे काम पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे वणवे यांनी निवडीनंतर सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन अडी-अडचणी सोडवण्याचेही काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे वणवे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे