हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षपदी जयवंत ओक यांची निवड

छत्रपती संभाजीनगर, १९ मार्च २०२३: हिंदु नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना ( ठाकरे गट )चे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या हिंदु संघटना व संप्रदायाच्या बैठकीत सर्वानुमते जयवंत (बंडू) ओक यांची हिंदु नववर्ष स्वागत समिती २०२३ च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यंदाचे १८ वे वर्ष असुन, बुधवार दिनांक २२ मार्च ला गुढीपाडव्याला शहरात पारंपारीक पध्दतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

प्रथेनुसार गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा चैत्र शुध्द १ प्रतिपदा, बुधवार, २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संभाजीनगरचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपतीचे पुजन करुन संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व यावर्षीच्या हिंदु नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष जयवंत (बंडू) ओक यांच्या प्रमुख उपस्थीतीत सुरुवात होणार आहे.
प्रथेप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्री शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती येथुन दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. ही शोभायात्रा शहागंज, गांधीपुतळा, सराफा रोड, सिटीचौक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर येथील महादेव मंदिर मैदानात पोहोचणार असुन, सायंकाळी ७ वाजता, १०८ भागवताचार्य श्री गोपालनंदजी महाराज, सुवर्णपालेश्वर, संस्थान कन्नड यांच्या अमृतवाणीने व मार्गदर्शनाने श्री खडकेश्वर शिव मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, अनिल पोलकर, अॅड. आशुतोष डंख, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, आदी जण या बैठकीला उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा