जालना ३ मार्च २०२४ : जालना जिल्ह्यातील १ लाख १५ हजार वीज ग्राहकांकडे ९४ कोटी २२ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी असुन संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केलय.
जालना परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे बिल वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी या महिन्यात सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली असल्याचं महावितरण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी