कोल्हापूर महाराष्ट्रातील शेवटची जिल्हा. निसर्गाने मुक्त हाताने वरदान दिलेला. त्यातच पश्चिमेकडील तालुके जे घाट माथ्यवर येतात ते सदाहरित अरण्यात येतात. त्यातीलच काही तालुक्यात वन्य प्राण्याची मोठी संख्या आहे. त्यात महतत्वाचे जो तालुका आहे. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने तो आजरा. प्रभुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. प्रभुरामचंद्र वनवासात असताना, काही काळ वास्तव हे आजऱ्यात होते. मृत्युजय कार शिवाजी सावंत यांचे जन्मगाव घनसाळ तांदळासाठी असलेले प्रसिध्द ठिकाण. शिवाजी सावंतांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ” सहयाद्रीच्या कुशीत वसले गाव चिमुकले माझे, अजर त्याचे सौदर्यंने नाव आजरा सांजे” ह्याच आजऱ्याचा व तेथील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी, दिल्ली मध्ये १० ऑगस्टला झालेल्या जागतिक हत्ती दीना निमित्त आजरा व चंदगड वासियांचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेला.त्या कारणाने कोल्हापूर व परिसराचा देशपातळीवर प्रसिद्धी मिळाली.
केरळमध्ये जूनच्या सुरुवातीसच मनाला प्रचंड अवस्थय करणारी घटना घडली. जंगली हत्ती कडून नुकसान होत आहे, या कारणाने काही स्थानिक लोकांनी हत्तीला जी गाभण होती. तीला अननसातून स्फोटके देऊन हत्या करण्यात आली. देशपातळीवर या गोष्टीचा निषेध केला गेला व सबांधितांवर प्रशासनाने कारवाई केली. त्यापेक्षा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हातील आजरा व चंदगड तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून हत्तीचा वावर आहे. पण तिथे अशा प्रकारे स्थानिकांनी कोठेही आतातायी पणा केला नाही, कि कुठहि हत्तीला साधी इजा होईल असे कोणतही कृत्य केले नाही.
कोल्हापूर जिह्यातील आजरा, चंदगड,भूदगड,राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा या तालुक्यात मोठया प्रमाणात हत्तीचा उपद्रव होत आहे. गेल्या ५ वर्षात हत्तींकडून ९ व्यक्तींवर जीवघेना हले झाले आहेत. १० लाखाची नुकसान भरपाई शासनाकडून स्थानिकांना वाटप करण्यात आली. नुकसान हत्ती कडून झालेल्या दोन हजारांच्यावर घटना नोंद आहेत. सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वनविभागाच्या आकडेवारी नुसार १४ हत्तीचे अस्तित्त्व आहे व त्यातील बऱ्यापैकी हत्ती हे आजरा व चंदगड तालुक्यात मुक्काम व वावर आढळतो. दोन्ही तालुक्यात असणारी धरण, तलाव यांची संख्या मोठी आहे. आजऱ्याला तर महाराष्ट्राला दुसरी चेरापुंजी म्हणुन ओळखले जाते. त्यामुळे पाण्याची १२ महिने मुबलकता आहे. त्या कारणाने हत्तीचे आवडते खादय हे बांबू हि मुबलक उपलब्ध आहे. त्या कारणाने हत्तीचा वावर हा वाढतच चालला आहे. रोज शेतीचे नुकसान होत आहे पण कोणत्याही शेतकऱ्यांनी हत्तींना इजा होईल आहे केले नाही उलट स्थानिक शेतकऱ्याची मागणी आहे कि वनविभागाकडे हत्तीचे खाद्य हे जंगलात वनस्पतीची लागवड करावी. म्हणजे हत्ती जंगल सोडून बाहेर येणार नाहीत. हि गोष्ट आदराची आहे. स्वतःचे नुकसान होऊन हि स्थानिक शेतकरी हत्तींना मारण्याची भाषा बोलत नाही.
काही दिवसापूर्वी ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकरणात वाघाची संख्या वाढली म्हणून प्रशासनाने वाघांचा नसबंदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हाच मुळात चुकीचा होता. पण आजऱ्या सारख्या ठिकाणी शेतकरी व प्रशासन मिळून काम करत आहेत. हे अंत्यत आनंदायी वार्ता आहे. आजऱ्यातील शेतकरी ज्याप्रमाणे वन्यजीवाशी वागत आहेत, तसेच काही देशातील शेतकऱ्यांनी आणि प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे, जितका हाक आपला जमिनीवर आहे, तितकाच हाक प्राण्यांचा आहे. हेच मुळात आपण विसरत चाललो आहे. आजऱ्यातील गोष्टीमुळे वानजीवांच्याकडे सकारात्मक होण्यासाठी उचलेले हे पाय अभिमानाची गोष्ट आहे हे नक्की ?
स्थानिक शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर. हत्ती आमच्या शेतात येतात, पिकांचे नुकसान करतात हे खरे असेल तरी, त्यांना मारणे बरोबर नाही. त्यांना खादय व पाण्याची व्यवस्था जंगलालातच करा म्हणजे ते गावात व शेतात येणार नाही. ह्या गोष्टींची खुद्द केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जवाडेकर यांनी दखल घेऊन १० ऑगस्ट रोजी झालेला जागतिक हत्ती दीना निमित्त झालेल्या कार्यक्रमात स्थानिक शेतकऱ्यांचा गौरव पूर्ण उद्गार काढण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी