अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून, कुठे आणि कशी होणार?

पुणे, १४ ऑगस्ट २०२१: करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. सन २०२१-२२ साठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी लागू करण्यात आली होती. मात्र, सीईटी रद्द करण्यात आली असून उच्च न्यायालयाने अकरावीचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षण विभागाकडून अकरावीची प्रवेशप्रक्रिया आज, शनिवारपासून (१४ ऑगस्ट) सुरू होणार आहे.

महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशसाठी २१ ऑगस्ट २०२१ रोजी नियोजित सीईटी (Common Entrance Test ) रद्द केली होती. यासंदर्भात राज्य सरकारने २८ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला. या संदर्भात हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिला की, अकरावीमध्ये प्रवेश हा दहावीत मिळालेल्या गुणानुसारच करण्यात यावा. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणीही हायकोर्टाने फेटाळून लावली होती.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पहिली नियमित फेरी

१४ ते २२ ऑगस्ट – विद्यार्थ्यांनी नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज पडताळणी, संस्थास्तरावरील राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करणे

१७ ते २२ ऑगस्ट – प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, प्राधान्यक्रम नोंदवणे, महाविद्यालयांनी व्यवस्थापन आणि अंतर्गत राखीव जागा प्रत्यार्पित करणे

२३ ते २५ ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे, गुणवत्ता यादीवरील आक्षेप नोंदवणे, गुणवत्ता यादी अंतिम करणे

२५ ते २६ ऑगस्ट – विदा प्रक्रियेसाठी राखीव

२७ ऑगस्ट – प्रवेश फे रीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागा संके तस्थळावर जाहीर करणे, पात्रता गुण जाहीर करणे, प्रवेश जाहीर करणे (अ‍ॅलॉटमेंट)

२७ ते ३० ऑगस्ट – विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रक्रिया करणे, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश निश्चित करणे, प्रवेश निश्चित करणे, प्रवेश नाकारणे, प्रवेश रद्द करणे

कुठे आणि कशी?

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

चार फेऱ्या… केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली नियमित फेरी १४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. तर दुसरी नियमित फे री ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, तिसरी नियमित फेरी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर आणि विशेष प्रवेश फेरी १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती 11thadmission.org.in या संके तस्थळावर देण्यात आली आहे.

पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयातच…

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. त्या पसंतीक्रमापैकी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश जाहीर होऊनही प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल आणि त्याला पुढील विशेष फेरीद्वारे प्रवेश दिला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा