सातारा, दि.५ जून २०२०: ६० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी हजारो प्रकल्पग्रस्तांचा आणि त्यांच्यामधूनच निर्माण झालेल्या अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित आहे.
गेल्या ३ वर्षामध्ये त्यांनी २ प्रदीर्घ ठिय्या आंदोलने केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातील बैठकीत आणि त्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्रीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही प्रत्यक्षात या प्रकल्पग्रस्तांची एकही मूलभूत समस्या मार्गी लागलेली नाही.
यामुळे उपासमारीने करण्यापेक्षा लढून मेलेले जास्त योग्य होईल, अशा निर्णयाला येऊन या प्रकल्पग्रस्तांनी कायद्याच्या चौकटीत आणि शांततामय मार्गाने हे आंदोलन ८ जूनपासून सुरू होणार असून, आंदोलन हे कोयना धरणग्रस्त गावात मोठया प्रमाणात आपापल्या घरासमोरील आंगणामध्ये आंदोलन सुरू होईल.
या संदर्भात तातडीने निर्देश होऊन लवकरात लवकर कारवाई करावी.असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने डॉ. भारत पाटणकर, हरिश्चंद्र दळवी, मालोजी पाटणकर ,महेश शेलार, सचिन कदम, चैतन्य दळवी, सीताराम पवार, रामचंद्र कदम, अर्जुन सपकाळ, परशुराम शिर्के आदीनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: