कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचा एल्गार, आंदोलनाचा तिसरा दिवस

पुणे, २५ डिसेंबर २०२०: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर युवक क्रांती दलाने २३ डिसेंबरला रोजी सुरू केलेल्या सत्याग्रही आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत आंदोलन चालूच आहे. मात्र अजूनही विद्यापीठ प्रशासनाकडून अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात आलेल्या त्रुटींबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अहमदनगर, नाशिक, जळगाव, पुणे, शिरूर, मालेगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांकडे थंडीच्या संरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांपासून पुरेसे कपडेही नाहीत. चहा, नाष्टा आणि जेवण या सर्व गोष्टी विद्यार्थी स्वतः बनवून दिवस काढत आहेत.

२४ डिसेंबरच्या रात्री ११ नंतर पोलिसांनी परवानगीचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थ्यांची नावे लिहून घेतली. विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आता युक्रांद मागार घेणार नाही. अशी युक्रांदची भूमीका आहे.

विद्यापीठाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अत्यंत कडाक्याच्या थंडीत राहावं लागतं आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये. कुण्या विद्यार्थ्यांला काही झालं तर त्यासाठी विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल. अशी माहिती युक्रांदचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे यांनी दिली.
आंदोलनात युक्रांदचे पदाधिकारी संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, नीलम पंडित, कमलाकर शेटे आणि विद्यार्थी आंदोलक सहभागी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा