इलॉन मस्क यांच्याकडून Meta वर कायदेशीर कारवाईचे संकेत

पुणे, ७ जुलै २०२३ : शब्दसंवादावर भर देणारे चर्चापीठ म्हणून लोकप्रिय असलेल्या, ‘ट्विटर’ या सोशल मीडिया माध्यमाशी थेट स्पर्धा करणारे ‘थ्रेड्स’ हे नवीन सोशल मीडिया ॲप, फेसबुक-इन्स्टाग्रामची कंपनी असलेल्या ‘मेटा’ने गुरुवारपासून लॉन्च केले. इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यापासून ट्विटरवर वारंवार होत असलेल्या बदलामुळे कंटाळलेल्या युजर्सला आकर्षित करण्याचा ‘थ्रेड्सचा हा प्रयत्न असून, पहिल्याच दिवशी अवघ्या १२ तासांत सव्वा दोन कोटी जणांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे.

twitter सारखेच थ्रेड्स अ‍ॅप मार्क झुकरबर्गने लॉन्च केल्यानंतर त्यांना यावरून आता कायदेशीर लढाईला सामोरं जाव लागण्याची चिन्हं दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ट्वीटरचे एलन मस्क यांनी दावा केलाय, की मेटाने जुन्या ट्वीटर टीमला सोबतीला घेऊन नव्या प्लॅटफॉर्मची तयारी केली आहे. ट्विटरचे वकील अलेक्स स्पिरो यांनी Meta CEO मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये अवैधरितीने ट्वीटरच्या गोपनीय प्राथमिकता आणि intellectual property वर डल्ला मारल्याचा आरोप आहे.

ट्विटर आणि थ्रेड्स मधील फरक
मेटा ने थ्रेड्स एक स्वतंत्र अॅप म्हणून लाँच केले आहे परंतु वापरकर्ते इन्स्टाग्रामच्या मदतीने त्यात लॉग इन करू शकतात. मेटाचे इंस्टाग्राम अॅप हे फोटो-शेअरिंग मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर थ्रेड्स हे ट्विटरसारखेच मजकूर-आधारित सोशल मीडिया माध्यम आहे. थ्रेड्सवर एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे. तर ट्विटरवरील शब्दमर्यादा जवळपास दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, फोटो आणि पाच मिनिटांपर्यंतच्या व्हिडिओ जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल. मास्क ने ट्विटरवर ताबा घेतल्यापासून कामगार कपात, तसेच ॲपवरील ओळख पडताळणीसाठीची मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता कमी होत चालली आहे. जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा ‘थ्रेड्स’ला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या अ‍ॅपप्रमाणेच थ्रेड्सदेखील वापरकर्त्यांची वैयक्तिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक तपशील, संपर्क क्रमांक, इंटरनेटवरील वापराचे तपशील आदी माहिती गोळा करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

युरोपात ‘थ्रेड्स’ नसणार आहे. युरोपीय महासंघाचे ‘डेटा’ गोपनीयतेविषयीचे नियम कठोर असल्याने सध्या हे अ‍ॅप युरोपीय देशांत सुरू करण्यात आलेले नाही. युरोपातील २७ देशांमध्ये हे अ‍ॅप नसेल, असे ‘मेटा’ने आयर्लंड येथील डेटा प्रायव्हसी कमिशनला कळवले आहे. जगभरातील १०० देशांत हे अ‍ॅप सुरू झाले आहे, तर येणाऱ्या काळात थ्रेड्स’ ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा