इलॉन मस्क पुन्हा चर्चेत ….

पुणे:२५ जुलै २०२२: इलॉन मस्क हे कायम कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने चर्चेत रहात असतात. यावेळी ते चर्चेत आहे, ते त्यांच्या तथाकथित अफेअरमुळे. इलॉन मस्क यांचे त्यांचे मित्र गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिनच्या पत्नी शनहानसोबत अफेअरच्या चर्चा सध्या समोर आल्या आहेत. पण इलॉन मस्क यांनी या चर्चां अमान्य केल्या आहे.

वास्तविक सर्गेई ब्रिनने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. एलॉन मस्कसोबत आपल्या पत्नीचं अफेअर असल्याचं सांगत वेगळं होण्याची मागणी केली होती. ब्रिनने २००८ साली आलेल्या आर्थिक संकटावेळी एलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीला वाचवलं होतं. एलॉन मस्क आणि सर्गेई ब्रिन चांगले मित्र होते. दोघांचं एकमेकांच्या घरी येणंजाणंही होतं. याच दरम्यान, मस्क आणि ब्रिनची पत्नी शनहान यांचं अफेअर सुरू झालं. शनहानच्या एका जवळच्या व्यक्तीने जर्नलला सांगितलं की ब्रिन आणि शनहान वेगळे झाले होते. मात्र अफेअरच्या काळात दोघे एकत्र राहत होते.

ब्रिनने जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मस्क आणि शनहानच्या अफेअऱबद्दल कळताच त्याने घटस्फोटाची मागणी केल्याचं जर्नलने सांगितलं होतं. मात्र ब्रिनने याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर शनहाननेही याविषयावर बोलणं टाळलं आहे.

एलॉन मस्कने ट्वीट करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ निराधार आहे. मी आणि सर्गेई मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टी करत होतो. मी निकोल शनहानला तीन वर्षात केवळ दोन वेळाच पाहिलंय, तेही आजूबाजूला असंख्य लोक असताना. त्यामध्ये काहीही रोमँटिक नव्हतं.सध्या इलॉन मस्कच्या राशीचे ग्रह फिरले आहेत की काय, देव जाणे. पण आधी टिव्टरचा करार आणि नंतर आता अफेअर, असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असल्याने त्यांचे नाव प्रत्येकाच्या ओठी आहे. पण आता यानंतर ते कुठल्या चर्चेतून समोर येतात, याची वाट पहावी लागेल, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा