ट्विटर “सुपर स्लो” असल्याबाबत एलॉन मस्क यांनी मागितली जाहिर माफी

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ : ४४ अब्ज डॉलर रुपयांना ट्विटर खरेदी केल्यापासून जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क सध्या ट्विटरमध्ये अनेक बदल करत आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर वापरणाऱ्यांकडून काल ट्विटर विविध देशांमध्ये अत्यंत कमी वेगानं चालत असल्यामुळं विविध तक्रारी येत होत्या. तरी दिलगीरी व्यक्त करत ट्विटर वापरकर्त्यांची ट्विटर “सुपर स्लो” असल्याबाबत एलॉन मस्क यांनी जाहिर माफी मागितलीय. शिवाय ट्विटरच्या नवीन फीचर बद्दल मस्क यांनी अनेक माहिती दिलीय.

११५ मिलियनहून अधिक एलॉन मस्क यांचे ट्विटरवर फॉलोअर्स आहेत. दरम्यान, ट्विटरवर ब्लू टिक केवळ प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, पत्रकार आणि सार्वजनिक व्यक्तींच मिळायची. दरमहा ८ डॉलर देणाऱ्या प्रत्येक ट्विटर वापरकर्त्यांला पण ट्विटरच्या नव्या सबस्क्रिप्शन प्रोग्रामनुसार ट्विटरवर व्हेरिफाइड होण्याचा शिक्का मिळणार आहे. ट्विटरवरील बनावट अकाऊंटची संख्या पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्यापासून मोठ्याप्रमाणात वाढू लागलीय. त्यामुळं कंपनीनं ट्विटर बाबत होणारे नवीन बदल घातकी असले तरी ही सेवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, ट्विटरचा कारभार हाती घेतल्यापासून एलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. रोज काय नवा निर्णय घेतील याचा काही नेम नाही. यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण मस्क यांनी यासंबंधित नुकतीच एक मोठी घोषणा केली होती. अलिकडे ट्विटरवरील ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनची सेवा त्यांनी बंद केली. ही सेवा नव्या रुपानं पुन्हा सुरु केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा