पुणे, २० जुलै २०२३ : आज सकाळपासून अनेकांच्या मोबाईलवर अलर्ट आला. हा मोबाईलवर अलर्ट पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. वास्तविक हा भारतीय दूरसंचार विभागाने नागरिकांना पाठवलेला अलर्ट आहे. पण या अलर्टचा अर्थ काय, तो का पाठवला गेला? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. या संदेशामुळे विविध भागातील नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
देशाच्या अनेक भागांमध्ये लोक त्यांच्या मोबाईलवर हा अलर्ट पाहत आहेत, परंतु यापासून घाबरण्याची गरज नाही. आत्तापर्यंत, कोणत्याही आपत्कालीन धोक्याचा अहवाल नाही आणि ही केवळ केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने केलेली चाचणी होती. दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेला संदेश सकाळी १०:२० वाजता मोबाईल फोनवर आला.
त्यानंतर सकाळी १०:२५ आणि १०:३१ वाजता या संदेशाने देशात तसेच महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या संदेशांमधील मजकूर सूचित करतो की हे भारत सरकारच्या आपत्कालीन चेतावणींची चाचणी करत आहेत. या मेसेजमुळे घाबरलेल्या नागरिकांनी सरकारकडून अचानक झालेल्या सतर्कतेबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड