कराची मध्ये भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

कराची, १८ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तान मधील कराचीमध्ये भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर फ्लाइटला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे ही परवानगी अशा काळात देण्यात आली जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीमावाद चरम बिंदूवर आहे. विमानातील एका प्रवाशाला हदय विकाराचा तीव्र झटका आल्यानं ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.पाकिस्तानने मानवता धर्म जपत कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली. मात्र, तरीही प्रवाशाच्या जीव वाचवण्यात यश आलं नाही.

पाकिस्तानच्या प्रशासनानं कराची विमानतळावर विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली. सौदी अरेबियाच्या रियाद येथून दिल्लीच्या दिशेला हे विमान निघालं होतं. मात्र, अचानक वाटेत एका ३० वर्षीय प्रवाशाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. प्रवाशी विमानातच बेशुद्ध पडला. प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने त्यााला तातडीने उपचाराची गरज होती. त्यामुळं ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.

कराची विमानतळावर डॉक्टरांनी प्रवाशाला तपासलं. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. विमानतळावरील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केलं. मृत प्रवासी उत्तर प्रदेशच्या बरेली येथीस रहिवासी आहेत. प्रवाशाला मृत घोषित केल्यानंतर विमान कराचीहून दिल्लीच्या दिशेला रवाना झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा