ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, खराब हवामानाचे कारण

पश्चिम बंगाल २७ जून २०२३: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुरक्षित असल्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

हवामानातील कमी दृश्यतेमुळे ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तर पश्चिम बंगालमधील सेवोके एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्या जलपाईगुडी जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेला संबोधित केल्यानंतर बागडोगरा याठिकाणी जात होत्या. दरम्यान पायलटने पश्चिम बंगालमधील सलुगारा येथील लष्कराच्या विमानतळावर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले.

सध्या पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरणातील दृश्यता कमी झाली आहे. तसेच पुढील काही वेळ तरी हवामान निरभ्र होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी प्रवासासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज दुपारपर्यंत कलकत्त्याला पोहचायचे असल्याने, या घटनेनंतर त्या रस्त्याने गाडीतून प्रवास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा