राजौरीमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार तर २ जण अजूनही लपल्याची भीती

जम्मू-काश्मीर, ६ ऑगस्ट २०२३: जम्मू-काश्मीरमधून मिळालेल्या मोठ्या वृत्तानुसार, राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एक दहशतवादी मारला गेला आहे, तर आणखी २ दहशतवादी लपून बसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

४ ऑगस्ट रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि सखोल शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सर्च ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. आणि सुरक्षा दलाकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.

त्यानंतर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हे तीन जवान जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला होता. याआधी पूंछमध्ये सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये परदेशी दहशतवादीही होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा