पुण्यातील हवाई दलाच्या जागेत पुन्हा अतिक्रमण

पुणे, ३० जून २०२३: नगर रोडवरील फॉरेस्ट पार्क या हवाई दलाच्या संरक्षित भागात, पुन्हा अवैध बंगाल्याच्या बांधकामासह सिमेंट स्लिपरच्या साहाय्याने संरक्षक भिंत बांधण्याचा उदयोग, वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालाय. ऐन पावसाळ्यात संरक्षक भिंत झऱ्यावरच उभी केली जात असल्याने येथील झरे फुटण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

या भागात पुन्हा अवैध बांधकाम सुरू झाल्याचे समजताच त्या भागात जाऊन पाहणी केली असता, तेथे एका बंगल्याचे बांधकाम होत असल्याचे दिसले. तसेच संपूर्ण परिसरात सिमेंट स्लिपरने संरक्षक भिंत बांधणे सुरू असुन हे काम जमीनीखालच्या जिवंत झऱ्यावरच सुरू असल्याने तेथे पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे.

वर्षभरापूर्वी या भागात होत असलेल्या अतिक्रमणाची दखल घेत दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या भागाची पाहणी करून संरक्षण विभाग व विमानतळ प्राधिकरणालाही अतिक्रमणाची माहिती दिली होती. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी मोठी कारवाई करीत, सर्व अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवला होता. त्यानंतर या भागात वर्षभर अवैध बांधकामे करणारांचे धाबे दणाणले व सर्व कामे ठप्प झाली होती. आता अशाच कारवाईची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा