जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेश होणार सुरू

मुंबई, ३० मे २०२३ : लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाची नोंदणी ५ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. प्रथम नोंदणीला प्रारंभ होणार असून एम एचटी सीईटीच्या निकालानंतर विधार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. यंदाही अभियांत्रिकी प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

गुणांच्या आधारे या तंत्र शिक्षण विभागातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तसेच कृषी अभ्यासक्रमासह तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत जाहीर होईल अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. त्या अगोदर प्रत्यक्ष प्रवेश नोंदणीला प्रारंभ केला जाणार आहे.

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठी यावर्षी ६ लाख ३६ हजार ८९ विधार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी पीसीएम मधून ३ लाख ३ हजार ४८ विधार्थ्यांनी नोंदणी केली होती तर २ लाख ७७ हजार ४०३ विधार्थ्यांनी परीक्षा दिली तर २५ हजार ६४५ विधार्थी गैरहजर होते. यावर्षी एमएचटी-सीईटी नोंदणीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत नोंदणीत मोठी वाढ झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना पुन्हा पूर्वीचे दिवस येतील असे संस्थाचालकांना आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा