पावसानं केला इंग्लंडचा घात, आयर्लंड ची इंग्लंडवर ५ धावांनी मात

11

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२२ मध्ये सुपर १२ सामन्यात ग्रुप १ मधील लढतील आयर्लंड ने इंग्लंडला पराभूत केलं आहे. या सामन्यांमध्ये झालेल्या पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल आयर्लंडच्या बाजूने देत त्यांना विजयी संघ म्हणून घोषित केले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १९.२ षटकात १५७ धावा केल्या. आयर्लंड कडून सर्वाधिक अँडी बालबिनीने ४७ चेंडूत ६२ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याचं बरोबर लॉक्रन टकर ने २७ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

१५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने १४.३ षटकात ५ विकेट्स गमावत १०५ धावा केल्या. तेव्हा त्यांना विजयासाठी ३३ चेंडू ५३ धावांची गरज होती. मात्र त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. व पंचांनी काही वेळाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंड ला अवघ्या ५ धावांनी विजयी घोषित केले. इंग्लंड कडून सर्वाधिक डेव्हिड मलान ३५ धावा केल्या. तर मोईन अली १२ चेंडू २४ धावा करून नाबाद राहिला. व लियाम लिविंगस्टोन दोन चेंडूत एका धावेवर नाबाद राहिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा