मुंबई, २९ नोव्हेंबर २०२०: टेलिव्हीजन ची लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भटनागर या वेळी कोरोना वायरस बरोबर लढा देत आहे. सध्या या अभिनेत्री वर मुंबईच्या गोरेगांव मधील एका रूग्णालयात उपचार सुरू आसून तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दिव्या सध्या वेंटिलेटर वर आहे, कोरोना मुळे तिच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर हा मोठ्या प्रमाणात कमी झालाय.
दिव्याच्या आईच्या मतानुसार गेल्या पाच सात दिवसापासून दिव्याला अस्वस्थता वाटत होती आणि शरीरातील तापमान ही वाढलं होतं. त्या नंतर तिच्या आईनं दिल्लीवरून मुलीच्या देखभालीसाठी यायचं ठरवलं आणि मुंबईत आल्यावर त्यांनी दिव्याची ऑक्सिजन पातळी चेक केली. ज्यामधे ती कमी झाल्याचे कळताच त्यांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल करून वेंटिलेटर वर ठेवले.
दिव्याची परिस्थिती आजून ही नाजूक बनली असून तिची कोरोना चाचणी ही सकारात्मक आहे, असे त्या म्हणाल्या. दिव्यानें गेल्या वर्षी डिसेंबर मधे लग्न केलं होतं आणि या अवघड समयी तिचा नवरा तिच्या सोबत नाही. म्हणजे तो कुठे गायब आहे, याबद्दल कुणाला माहिती नाही.
दिव्याचा पती गगन चा काहीच आतापता नसून दिव्याची आई देखील प्रचंड रागात आहे. त्या म्हणाल्या दिव्याचा नवरा हा फ्राॅड निघाला, तो तिला आसाच सोडून निघून गेला. एकदा त्यांचा फोन आला आणि दिव्याच्या सासरच्यांनी पैसे लागतील तर सांगा एव्हढंच बोलल्याचे आईने सांगितले. तर दिव्याने घरच्यांचा विरोधात जाऊन हे लग्न केलं होतं.
दिव्या भटनागर ही टेलिव्हीजन क्षेत्रातील एक अभिनेत्री आहे.दिव्या ने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘उड़ान’, ‘जीत गई तो पिया मोरे’, ‘विष’ अश्या अनेक लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका केल्या आहेत. दिव्या सध्या शशि सुमीत प्रोडक्शनच्या ‘तेरा यार हूं मैं’ या मधे काम करत आसून याच प्रोडक्शन हाउस ने दिव्याच्या या कठीण प्रसंगी मदत केली आहे आणि त्यासाठी दिव्या व तिच्या आईने कंपनीचे अभार मानले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव