कल्याण, दि. २१ जुलै २०२०: कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा जोमाने वाढतोय. मात्र यात उल्हासनगर सुद्धा मागे राहिले नाही. उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या सख्येत वाढ होताना दिसते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोमवारी दुपारी ४ वाजता उल्हासनगरमध्ये दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवा. त्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे त्यांनी या वेळेस उल्हासनगर महापालिकेला सांगितली . आवश्यक निधीही उपलब्ध करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.
या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह आमदार बालाजी किणीकर, महापौर लीलाबाई अशान, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांची उपस्थिती होती .
कल्याण-डोंबिवली दौऱ्यानंतरचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा ठाणे शहरातला हा दुसरा दौरा आहे. आदित्य ठाकरेच्या दौऱ्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये धारावी पॅटर्न राबवण्यात आला मात्र आता उल्हासनगरमध्ये आढावा बैठक, दौरा तर झाला मात्र आता यावर उल्हासनगर महापालिका कशाप्रकारे उपाय योजना करते हे पाहणे महत्वाचे ठरेल. कारण वाढती रुग्णसंख्या पाहता लवकरात लवकर कडक उपाययोजना करण गरजेच आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे