ESIC ची ‘आयुष्यमान भारत’ सोबत पार्टनरशीप

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा विभागाने (ESIC) आपल्या लाभार्थ्यांना वैद्यकिय सुविधा देण्यासाठी ‘आयुष्यमान भारत’बरोबर म्हणजे केंद्र सरकारबरोबर पार्टनरशिप केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या विशेष पार्टनरशिपने जवळपास १०२ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनालाभ मिळणार आहे. तसेच रुग्णालय सुरु करण्यासाठीच्या नियमांत देखील काही दिलासा देण्यात येईल. या माध्यमातून ESIC जवळपास १४ कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.
याबाबत श्रम आणि रोजगार खात्याचे मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले की, ESIC ने लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी नुकतेच आयुष्यमान भारतबरोबर पार्टनरशिप केली आहे.
जिल्हयात नवी रुग्णालये सुरु करण्यासाठीच्या काही नियमांत दिलासा मिळणार आहे. यानंतर आता ३० खाटा असलेले रुग्णालय सुरु करता येईल. जेथे २०,००० IPs उपल्बध असते. तसेच ESIC ने चितेंतून मुक्तता मोबाइल अ‍ॅप आणि भागीदारांसाठी हेल्प डेस्क उपलब्ध करुन दिला देण्यात येईल. असे गंगावार यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा