पुणे , दि. २८ मार्च २०२२ – दि २६ मार्च २०२२ रोजी सैनिक समाज पार्टीचे लोहगाव पुणे येथे ४ थे भव्य अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष ॲड. शिवाजीराव डमाळे , मुख्य मार्गदर्शक , महाराष्ट्र पार्टी प्रभारी राज्य सचिव ईश्वर मोरे तसेच महिला अध्यक्षा सुनीता झिंझुर्डे,जनरल सेक्रेटरी अरुण खिची आयोजक अरुण कदम, राजेंद्र खंडारे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या अधिवेशनात पार्टीची कोअर कमेटी स्थापन करण्यात आली असून विविध जिल्ह्यातील उपस्थित नवनिर्वांचिताना पद नियुक्तीच्या पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भाच्या विभागीय अध्यक्ष पदावर श्री राजेंद्र शालीग्राम, तर श्री तुकाराम नामदेव डफळ यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. चित्रपट दिग्दर्शक श्री जिवन कोल्हे यांची राष्ट्रीय रंगकर्मी अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली .श्री बाबासाहेब तुकाराम फराक्टे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,श्री दिपकराजे शिर्के यांची वडगाव शेरी पुणे विधानसभा क्षेत्र प्रमूख या पदावर निवड करण्यात आली. श्री गंगाराम काळूजी चिंचोले यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष ,श्री शिवाजीराव रंगराव चव्हाण यांची कोल्हापुर जिल्हाध्यक्ष,
श्री अनिल सातव यांची पुणे जिल्हाध्यक्ष आणि सौ.दुर्गा केतन खिची यांची अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.
तसेच यावेळी सैनिक समाज पार्टीच्या कोअर कमेटीचीही स्थापन करण्यात आली. सदर कोअर कमेटीत पार्टीचे राष्ट्रीय सचिव व निरिक्षक जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे मा.ईश्वर मोरे, प्रदेशाध्यक्ष ॲड मा. शिवाजी डमाळे,प्रदेशउपाध्यक्ष मा.अरुण कदम मा. राजेंन्र्द खंदारे, दिपकराजे शिर्के, कन्हैया उपाध्ये यांची निवड करण्यात आली. याशिवाय महिलांच्या माहेरग्रुपमध्ये पुण्यामधून सौ.सपना राजेंद्र खंदारे,सौ.नुतन शंतनु मोरे, सौ.हेमलता तुकाराम डफळ,सौ.सीमा जोशी तसेच कोल्हापूर येथून सौ. रुपाली चव्हाण यांना समाविष्ट करण्यात आले.सदर अधिवेशनात विविध पदाधिका-यांनी आपल्या मनोगतातून सैनिक समाज पार्टीची ध्येयधोरणांविषयी माहिती दिली. महाराष्ट्र सरकार ३०० आमदारांना मुंबईत घर देणार या घोषणे विरूद्ध सैनिक समाज पार्टीच्यावतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध ठराव मांडण्यात आला, तसेच २०२३ जानेवारी मध्ये सैनिक समाज पार्टीचे समांतर (shadow) सरकार स्थापन करण्याचा संमती ठराव ही एकमताने पारित करण्यात आला, पार्टीचे सन्माननिय पदाधिकारी व निवड झालेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदेश उपाध्यक्ष अरुण कदम साहेब यांनी केली , तसेच मुख्य मार्गदर्शन मा. ईश्वर मोरे आणि ॲड. शिवाजीराव डमाळे , महिला अध्यक्षा सुनिताताई झिंजुर्डे , यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.तुकाराम डफळ यांनी केले. पुणे येथील सैनिक समाज पार्टीच्या चौथ्या अधिवेशनाचे आयोजन व नियोजन मा.अरुण कदम,मा.राजेंद्र खंदारे, तुकाराम डफळ,कन्हैया उपाध्ये,यांनी केले. याप्रसंगी,बाबासाहेब तारडे, राकेश वाघ, शिंदे,तसेच विविध जिल्ह्यातील मान्यवर माजी सैनिक व समाजातील विचारवंत बहुसंख्येने उपस्थित होते. पुढील जिल्हानिहाय अधिवेशन घेण्यासाठी सर्व मान्यवर पदाधिका-यांनी लवकरच आयोजन करावे आणि आगामी येणार्या २०२४ च्या निवडणुकीची तयारी करावी असे आवाहन सैनिक समाज पार्टी, महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी