मुंबई, 26 जानेवारी 2022: बॉलिवूड गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लताजी या देशाची शान आहेत आणि देशभरातील लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. लतामंगेशकर यांची प्रकृती खालावल्यापासून सर्वजण त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 8 जानेवारी 2022 रोजी लता मंगेशकर यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबाकडून नवं वक्तव्य आलंय.
कुटुंबाकडून निवेदन
एक निवेदन जारी करताना, लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं- “लताजींच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आलीय, परंतु त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. डॉ.प्रतुत समदानी यांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीचे दैनंदिन अपडेट्स देणं शक्य नाही. ही पूर्णपणे कौटुंबिक गोपनीयतेची बाब आहे. आपण सर्वांनी या प्रकरणाचं गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. अफवा पसरवणं टाळा आणि लताजींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”
अनुपम-किरण यांनी लताजींसाठी केली प्रार्थना
लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत. अनुपम खेर, किरण खेर आणि स्मृती इराणी यांनी लताजींच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केलीय. लतादीदींना दाखल होऊन 17 दिवस झाले असून आता त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.
लतादीदी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात आणि प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगात त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेल्या असतात. लतादीदींनी 70 वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केलं आहे आणि आपल्या गायनानं सर्वांना प्रभावित केलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे