लॉकडाऊन नसलं तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार: राजेश टोपे

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२०: नोव्हेंबर महिन्यामध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. विशेष करून दिवाळीनिमित्त लोकांनी खरेदीसाठी केलेल्या गर्दीमुळं यात मोठी भर पडली आहे. त्यात फटाक्यांच्या धुरामुळं वाढलेल्या प्रदूषणाचा देखील यावर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे तर दिल्लीमध्ये संक्रमणाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी देखील आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहे.

दरम्यान या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशानं कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळं राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

डिस्टन्सिंग पाळली जात नसल्यानं राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. याबाबत संकेत उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या संबोधनात दिले. त्यांनीदेखील असं म्हटलं होतं की लॉक डाऊन हा माझा आवडीचा विषय नाही, परंतु जर जनतेनं खबरदारी घेतली नाही तर तसा विचार येत्या काळात करावा लागंल. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दिवसात टेस्ट कमी केल्या होत्या. मात्र आता कोरोनाच्या टेस्टही वाढवण्यात आल्या आहे. अशारीतीने टेस्टिंग वाढल्यात म्हणजे कोरोनाबाधितांची संख्याही वाढेल. याचा अर्थ लाट वैगेरे येईल असा होत नाही. मात्र काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. गरज पडल्यास कठोर पावलं उचलावी लागतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा