हिवाळी अधिवेशनातही शाई फेक प्रकरणाचा धसका; विधिमंडळात शाई पेनावर प्रतिबंध

नागपूर , १८ डिसेंबर २०२२ : भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर राज्य सरकारने देखील सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. याचे पडसाद आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळेल.

दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्राकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यभर याचे पडसाद उमटले. पुणे शहरात समता सैनिक दलाच्या सैनिकांना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली होती.

सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र असून, आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. विधिमंडळातही शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून कारवाई होत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा