कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात वेगवेगळे उपक्रम राबवत असलेल्या शिक्षकांचं कार्य मोलाचं आहे – सिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात वेगवेगळे उपक्रम राबवत असलेल्या शिक्षकांचं कार्य मोलाचं आहे असं प्रतिपादन शालेय सिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दूरदर्शनवरील जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना केलं. अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

स्वाध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत.असं त्या म्हणाल्या.

शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली. त्या म्हणाल्या, खऱ्या अर्थाने शिक्षकांमुळेच या काळामध्ये शिक्षण सुरु राहिले आहे. तसेच अशा शिक्षकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी SCERT मार्फत ऑनलाईन शिक्षक विकास मंच हा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा