गोल पोस्ट इतर राजकारण “रिपब्लिक न्यूज चॅनलच्या बाबतीत सर्व खुलासा झाला पाहिजे: राजेश टोपे

“रिपब्लिक न्यूज चॅनलच्या बाबतीत सर्व खुलासा झाला पाहिजे: राजेश टोपे

अहमदनगर, १० ऑक्टोंबर २०२०: बनावटी टीआरपी बाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. यानंतर बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या दोन चैनल वर कारवाई करण्यात आली. यासह रिपब्लिक टीव्ही वर देखील आता कारवाई केली जात आहे. रिपब्लिक टीव्ही विषयी अनेक खुलासे आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडच्या काळात रिपब्लिक टीव्ही’नं मुंबई पोलीस व राज्य सरकारवर अनेक टीका केल्या होत्या. त्यातच आता रिपब्लिक टीव्हीवर कारवाई होत असताना राजेश टोपे यांनी देखील आपलं वक्तव्य केलं. अहमदनगर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रिपब्लिक न्यूज चॅनलचा टीआरपी प्रकरण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशासह इतर गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. “रिपब्लिक न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पानी का पानी व्हायलाच पाहिजे. कायद्याच्या अनुषंगानं धूळ फेकण्याची कामे काही चॅनल्सनं केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. तसेच विनाकारण यंत्रणेला पोलीस खात्याला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर दूध का दूध आणि पानी का पानी व्हायला पाहिजे,” असं स्पष्ट मत टोपेंनी मांडलं आहे.

“महाराष्ट्र सरकार हे लोकशाही आघाडीचं सरकार आहे. सरकार कोरोना काळात अत्यंत पारदर्शक आणि जेवढ्या जमेल तेवढ्या कार्यक्षमतेनं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्याकडून लक्ष विचलित करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत असतील तर ते चुकीचं आहे,” असंही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version