मुंबई, दिनांक १४ सप्टेंबर २०२२ : प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांची सर्वसामान्याना न्याय देण्याविषयी असणारी तळमळ आणि कार्य सर्वश्रुत आहे. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर धरून न राहता अधिकाऱ्यांशी वाद घालणे त्यांच्या स्वभावातच आहे. असेच मागील एका प्रकरणांत मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्याप्रकरणी बच्चू कडू यांना अटक करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांची अपंगांसाठी कार्य करणारी एक संस्था आहे. शेतकऱ्यांविषयी त्यांना विशेष आदर आहे. बच्चू कडू यांना अटक केल्यानंतर गिरगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतले असून, पुढील वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
३० मार्चला सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित, यांना आमदार बच्चू कडू यांच्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या प्रकरणी आज बच्चू कडू स्वतःहून गिरगांव कोर्टात हजर झाले. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मरीन लाईन पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतले आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना पोलीस जेजे रुग्णालयामध्ये घेऊन गेले आहेत.
गिरगांव कोर्टातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर बच्चू कडू यांचे वकील सेशन कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते. सेशन कोर्टामधून बच्चू कडू यांना जामीन मिळू शकतो. दरम्यान कडू यांच्या न्यायालयीन कोठडी प्रकरणामध्ये गिरगांव कोर्टाचे न्यायाधीश पटेल, यांनी आपले विशेषाधिकार वापरण्यास नकार दिला. कोर्टाकडे असलेले विशेष अधिकार वापरून कडू यांना जामीन मंजूर करता आला असता. परंतु न्यायाधीशांनी ही केस सेशन कोर्टात हस्तांतरीत केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर