वाघोली, दि. १७ ऑगस्ट २०२०: वाघोलीमध्ये २०११ पर्यंतचे झोपडीधारक आहेत त्यांच्या ग्रामपंचायत दप्तरी ताबडतोब नोंदी करण्यात याव्यात, व त्यांना त्वरित ८ अ चे उतारे द्यावेत. १६ फेब्रुवारी २०१८ ला जो शासनाचा निर्णय झाला होता यामध्ये दोन हजार अकरा पर्यंतचे घरे यांच्या नोंदी करण्यात याव्यात परंतु वाघोली ग्रामपंचायतने काही तांत्रिक अडचणीमुळे त्या नोंदी अजून पर्यंत करू शकले नाहीत.
परंतु, शासन निर्णयाप्रमाणे नोंदणी करणे बंधनकारक असल्याने या नोंदी त्वरित करण्यासाठी तरी यापुढे ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी व वाघोली ग्रामपंचायत समोर झालेल्या आज बेमुदत घंटानाद आंदोलनामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला त्यांच्या लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, २७ ऑगस्टच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेनंतर नोंदणीची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे. तरी कृपया वाघोलीतील गायरान मधील रहिवाशांच्या अधिकृत नोंदी करून येथील गायरान जागेतील रहिवाशांना त्वरित ८ अ चे उतारे द्यावेत, असे या आंदोलना प्रसंगी मत व्यक्त करताना हवेली तालुका पंचायत समितीच्या सदस्य, तथा कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, यांनी सांगितले आहे.
वाघोली येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाघोलीतील गायरान मधील रहिवाशांना त्वरित ८ अ चे उतारे मिळावेत या मागणीसाठी वागेश्वर नगर, सुयोग नगर, बजरंग नगर, बुरुंज आळी व इंद्रा नगर, रहिवाशी रस्त्यावरील ग्रामस्थांच्यावतीने शिवसेनेचे हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य तथा कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बेमुदत घंटानाद आंदोलन सातशे ते आठशे ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज पार पडले. याप्रसंगी सुरज मांदळे, पंडित डोंगरे, पंडित मुरकुटे, अंबादास साळुंखे, आधी रहिवाशी ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक उपस्थित होती यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने वाघोली येथील गायरान जमिनीवरील बांधकामे कायमस्वरूपी करून संबंधितांना ८ अ चे उतारे देण्यासाठी आज घेतलेल्या घंटानाद आंदोलन मागे घेण्याबाबत आज शिवसेनेचे हवेली पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे यांना लेखी पत्र देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी अनिल कुंभार, माजी उपसरपंच समीर भाडाळे, रासपाचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर गोरे, सुधीर दळवी, सुधीर भाडाळे, आदी ग्रामपंचायतचे सदस्य कर्मचारी उपस्थित होते. २७ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीने या विषयाबाबत सभा बोलवली आहे. या सभेमध्ये विषय पत्रिकेवर विषय घेऊन सन २०११ पर्यंतच्या वाघोली येथील गायरान जमिनीवरील निवासी बांधकामाच्या नोंदी अनुकूल करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. असे अनिल कुंभार ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वाघोली यांनी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे