शारिरीक शिक्षण दिनानिमित्त माझी वसुंधरा सायकल रॅली उत्साहात

पुणे, २५ जानेवारी २०२१: पर्यावरण संसक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शारिरीक शिक्षण दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फाउंडेशन, वनराई, आधार सोशल ट्रस्ट, सिंहगड युवा फाउंडेशनच्यावतीने व संकल्प मानव संसाधन विकास संस्थेच्या सहकार्याने हि सायकल रॅली झाली. सनसिटी रोड, आनंद नगर ते माणिकबाग मार्गे धायरी येथे सायकल रॅलीचा समारोप झाला.

यावेळी पुणे मनपा सहाय्यक उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, घनकचरा विभाग पांढरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास घेवारे, मानसोपचार तज्ञ डॉ. पी.एन. कदम, वनराईचे सचिव अमित वाडेकर, अभिनेत्री स्मिता गोंदकर, संतोष चाकणकर, मनिष जगदाळे, माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, ललित राठी, अमित कुदळे, विशाल टोले उपस्थित होते.

शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिका नागरिकांच्या सहभागातून ‘शून्य कचरा प्रकल्प’ म्हणजेच झिरो गार्बेज सिस्टीम राबविणार या साठी माझी वसुंधरा अंतर्गत माय अर्थ आणि इतर सहयोगी संस्थांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे मनपा सहाय्यक उपायुक्त माधव जगताप यांनी अभिनंदन केले .
या वेळी अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी धायरी भागातील कचरा गोळा करून अभियानास सुरवात केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा