गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा बारामती-सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसला अपघात; तीन मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ...

बारामती-सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसला अपघात; तीन मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी

सांगवी (ता. बारामती), ३१ डिसेंबर २०२२ : पाहुणेवाडी (ता. बारामती) येथे विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात तीन मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करीत असताना ही घटना घडली. सागर क्लासेस, इचलकरंजी येथील इयत्ता आठवीं ते दहावी वर्गाच्या क्लासच्या मुलींची सहल औरंगाबाद, शिर्डी अशी आयोजित केली होती.

शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना ‘यशोदा ट्रॅव्हल्स’ची बस बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत पुलावरून खाली गेल्यामुळे २४ मुली किरकोळ व तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. बसमध्ये एकूण ४८ मुली आणि ५ स्टाफ मेंबर होते. जखमी मुलींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version