मला माफ करा…मजबुरी म्हणून तुमची सायकल घेऊन जातोय!

राजस्थान ,दि१७ मे २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर परप्रांतीय कामगार आपल्या गावी जाण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे.

अशीच एक घटना राजस्थामधून समोर येत आहे. भरतपूर येथे राहणाऱ्या एका कामगाराने आपल्या घरी उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी एका सायकलची चोरी केली. मात्र या भावनिक झालेल्या मजुरांने सायकल चोरताना त्या ठिकाणी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्याने लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मोहम्मद इक्बाल खान असे या मजुराचे नाव असून इक्बाल खानने चिठ्ठीत लिहिले की, ‘मी एक मजूर आहे. सध्या लॉक डाऊनमुळे मी मजबूर देखील आहे. मी तुमचा गुन्हेगार असून तुमची सायकल घेऊन जात आहे. त्याबद्दल मला क्षमा करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याकडे घरी जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. म्हणून मी तुमची सायकल घेऊन जात आहे. शिवाय मला एक दिव्यांग मुलगा असून त्याला चालता येत नाही. हेच सायकल नेण्याचे खरे कारण आहे. अशी प्रांजळ कबुली देखील इकबाल याने दिली आहे.

राजस्थानमधल्या भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नावाच्या व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरी केली होती. आपल्या अंपग मुलाला बरेलीत परत नेण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. या सायकलवरून त्याने जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास केला.

या चिठ्ठीची सध्या भावनिक चर्चा चांगलीच रंगली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा