बाॅलिवूडचे “सुरमा भोपाली” जगदीप जाफरीचीं यांची एक्जिट

मुंबई, ९ जुलै २०२० : हे वर्ष जवळपास सर्वांसाठीच फार वाईट ठरतंय त्या खास करून बॉलिवूडला थोडे जास्तच म्हणावे लागले तर त्यात फार काही वावगे ठरणार नाही. कारण या कोरोना काळात बाॅलिवुडने अनेक तारे गमावले आहेत. अनेक ता-यांनी जगाच्या या रंगमंचावरून वेळी अवेळी अखेरचा निरोप घेतला आहे.

शोले चित्रपटातील ” हमारा नाम भी सुरमा भोपाली ऐ भाई नही ” या संवादाने संपूर्ण सिने रसिकांच्या लक्षात राहिल अशी भुमिका करणारे प्रसिद्ध विनोदी कलाकार जगदीप यांनी काल रात्री उशीरा या जगाचा जगाच्या निरोप घेतला. एक हरहुन्नर कलाकार आणि विनोदाचा बादशाद काळाच्या पडद्या आड गेला.

जगदीप जाफरी यांचे काल निधन झाले , वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी आखरेचा श्वास घेतला. लहानपणापासूनच ते चित्रपट सृष्टीत काम करत होते तर आज पर्यंत त्यांनी ४०० पेक्षा आधिक चित्रपटात काम केले आहे.एक उत्तम हास्य आभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.तर “शोले” चित्रपटातील त्यांची “सुरमा भोपाली” या व्यक्तीरेखेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली.

त्यांच्या या हस्य कलेचा वारसा जावेद जाफरींना मिळालाचे आपल्याला पहायला मिळते.त्या बरोबरच जाफरी परिवारची तिसरी पिढीने देखील चित्रपटात पाऊल टाकले आसून “मलाल” चित्रपटातून मिजान जाफरीने पर्दापण केेले आहे.

किस किस की, शोले, किस्मत,परवाना,कलयुग के अवतार,कर्तव्य,राम शस्त्र,हम हैं बेमिसाल, अंदाज़ अपना अपना, मुस्कुराहट, फूलवती, जिगरवाला, झूठी शान, सनम बेवफ़ा, फूल और काँटे, जमाई राजा, नम्बरी आदमी, पति पत्नी और तवायफ, शानदार, क्रोध,मैं तेरा दुश्मन, या सारख्या शेकडो चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा