उल्हासनगरात वडापावच्या दुकानात स्फोट

5

उल्हासनगर, दि. ८ ऑगस्ट २०२०: काही दिवसांपुर्वी डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात केमीकल कंपनीमध्ये स्फोट झाला होता. तर आज उल्हासनगरमध्ये भीषण आग लागली. उल्हासनगर कॅम्प चार परिसरातील व्हीनस चौकातील ‘जय मातादी’ वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.

या आगीत पप्पू गुप्ता या दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. या सर्वांना उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. जखमी ११ जणांमध्ये दुकानात काम करणारे कामगार आणि काही ग्राहक यांचा समावेश आहे .

आगीत होरपळलेल्या व्यक्तींच्या तब्येतीबाबत अद्याप डॉक्टरांनी काही सांगितले नाही. या वडापावच्या दुकानाला लागलेल्या आगीती झळ ही आजूबाजूच्या दुकानांपर्यत पोहोचली आहे. हे दुकान मार्केट परिसरात असल्याने उल्हासनगर कॅम्प चार परिसरात एकच गोंधळ उडाळा होता .

न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा