काबूल मशिदीत स्फोट, २० ठार, ४० हून अधिक जखमी

7

काबुल, १८ ऑगस्ट २०२२: अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये बॉम्बस्फोट झालाय. काबूलमधील मशिदीत हा बॉम्बस्फोट झाला. तर २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी सुमारे ४० जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. काबूलच्या आपत्कालीन रुग्णालयाने सांगितलं की तेथं एकूण २७ लोकांना दाखल करण्यात आलं आहे. त्यात पाच मुलांचाही समावेश आहे.

सध्या संपूर्ण परिसर तालिबानी सुरक्षा रक्षकांनी सील केलाय, सध्या जखमींना काबूलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात नेलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहरातील सार-ए-कोटल खैरखाना येथे हा बॉम्बस्फोट झाला. काबूलच्या सुरक्षा विभाग खालिद जरदान यांनी स्फोटाला दुजोरा दिलाय.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये केवळ मशिदींना लक्ष्य करण्यात आलं. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आतापर्यंत शिया मशिदींना आयएस या दहशतवादी संघटनेकडून लक्ष्य केलं जात होतं. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा