मुंबई, २६ फेब्रुवरी २०२१: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर संशयित स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या २० जिल्सिन रॉड सापडल्या आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार वृत्तानुसार, संशयीत एसयूव्हीची माहिती मिळाल्यानंतर श्वान पथक, बॉम्ब पथक आणि एटीएसची टीम मुंबई पोलिसांसह घटनास्थळी पोहोचली. एटीएसने दहशतवादी अँगल संबंधित तपास सुरू केला आहे. संशयीत वाहन मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घराच्या सुरक्षा कर्मचार्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहे की २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कार्मिकल रोडवर एक संशयास्पद वाहन सापडले आहे. ते म्हणाले की, तपासणी दरम्यान वाहनात स्फोटक जिलेटिन सापडले आहे. पोलिसांनी सांगितले की, हे असेंबल केलेले स्फोटक यंत्र नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या संशयित वाहनामध्ये काही नंबर पेट्स मिळाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील काही गाड्यांशी या नंबर प्लेट मेळ खात आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. अनिल देशमुख यांनी सांगितले की या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे व लवकरच सत्य समोर येईल.
जिलेटिन बाबतीत बोलायचे झाले तर, नुकतेच या पदार्थाच्या स्फोटामुळे कर्नाटक मध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला होता. यातील एक स्पोर्ट जानेवारी महिन्याच्या अखेरीस कर्नाटक मधील शिमोगा येथे झाला होता. या स्फोटांमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसरा स्फोट याच महिन्यात चिकबल्लापुर येथे झाला होता. या स्फोटांमध्ये सहा लोक मृत्युमुखी पडली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे