जेजुरी, पुणे १३ नोव्हेंबर २०२३ : सोमवती अमावस्ये निमित्त राज्याचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी खंडोबा देवाचे दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. या दिवशी खंडोबा देवाचे कऱ्हानदी स्नान महोत्सव असते. त्यासाठी येणाऱ्या लाखो भविकांकरिता, धालेवाडी येथील रंभाईमाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध सोयसुविधा राबविण्यात आल्या. विशेषता पार्किंगचे भव्य व्यवस्थापन तसेच भाविकांना सुलभ सोयसुविधा या जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदे मार्फत करण्यात आले.
देवाच्या स्नान उत्सव मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांकरिता मोफत महाप्रसाद वाटप व्यवस्था करण्यात आली. रंभाईमाता देवस्थान ट्रस्ट मार्फत शेकडो स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून भविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहें. धालेवाडी रंभाईमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव काळाने, शरद काळाने यांनी तसेच माजी आमदार अशोक टेकवडे, देवसंस्थान विश्वस्त कमिटीने कामांची पाहाणी करून समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, मंडळ अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सचिव मुरलीधर काळाने, सरपंच वंदना काळाने, बबनआबा काळणे, एकनाथ काळणे, कैलास काळणे आदी मान्यवर उपस्थित होते. रंभाईमाता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष हनुमंतराव काळाने हे कऱ्हानदी परिसराचे सुशोभीकरण आणि तेथील सोय सुविधा बाबत सतत प्रयत्नशील असतात.
न्यूज अनकट प्रतिनीधी : विजयकुमार हरीश्चंद्रे