फडणवीस पुन्हा होत आहेत ट्रोल, फडणीसांना नेटकरी म्हणाले ‘आत्मनिर्भर’

10

नागपूर, दि. १६ मे २०२०: सध्या नेटक-यांच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस आहेत. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून त्यांना सध्या विविध कारणांसाठी ट्रोल केले जात आहे. फडणवीस यांच्या वर वेगवेगळे मेम्स देखील वायरल होताना सध्याच्या काळात बघण्यास मिळत आहेत. सध्या अशाच एका कारणासाठी ते पुन्हा एकदा ट्रोल होताना बघण्यास मिळाले आहे. फडणवीस यांनी गुरुवारी नागपूरमधील मेडिकलच्या विविध विभागांना भेट देत सोयींची पाहणी केली. नागपूरमधील अधिष्ठाता कार्यालयातून त्यांनी व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे ट्राेमा केअरमध्ये उभारलेल्या कोविड रुग्णालयातील दोन रुग्णांशी संवाद साधून त्यांची चौकशी केली.

फडणवीस गुरुवारी दीड वाजता मेडिकलला पोहचले व अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली. फडणवीस यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर फडणवीस यांनी स्वतः च कमेंट करुन ‘सुपर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुनच आता नेटकऱ्यांनी फडणवीस यांना ट्रोल केल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये फडणवीस चेहऱ्यावर मास्क लावून एका अद्द्यायावत तयार केलेल्या बेडच्या हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. या व्हिडिओ वर त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर त्यांनी आपल्याच व्हिडिओला टाळ्या वाजवणारे इमोजी टाकत 👏👏’सुपर’ असे लिहिले. यावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलेले बघण्यास मिळाले.

तुम्हीच काय कमेंट करताय असा प्रश्न काहींनी विचारला तर काहींनी ‘आत्मनिर्भर’ इतकीच कमेंट या प्रतिक्रियेला रिप्लाय देताना केली होती. ‘सर तुम्हीच धन्यवाद इमो्जी टाकता हे जनतेने टाकले पाहिजेत’, ‘सर तुम्हीच कमेंट करायला लागले’, ‘यालाच म्हणतात स्वत:ची पाठ स्वत:च थोपटणे’, ‘स्वत:च्या पोस्टला तुम्ही स्वत: सुपर म्हणताय’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या प्रतिक्रियेवर दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी