गोल पोस्ट महाराष्ट्र मुख्यमंत्री होण्याचे फडणवीस यांनी फक्त स्वप्नच पहावीत… गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री होण्याचे फडणवीस यांनी फक्त स्वप्नच पहावीत… गुलाबराव पाटील

जळगाव, दि. १८ जुलै २०२०: फडणवीसांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पहावे असा टोला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. याचे कारण असे की भाजपचे आता तोंडाला आलेला घास निसटला त्यामुळे भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. परंतु या मोर्चेबांधणीची आणि फडणवीस यांची खबर घेत गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांनी फक्त मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहावे असा टोला लावला आहे.

उद्धव ठाकरे हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांसाठी केलेली कामे लोक जाणून आहेत. उद्धव ठाकरे हे जनतेच्या पसंतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार पडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी भजापाचे नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचे सरकर लवकरच पडेल असे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरूनही पाटील यांनी टीकेचा बाण सोडला. “नारायण राणे यापूर्वी कुठे होते आणि आता ते कुठे आहेत. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होतं हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे. प्रवीण दरेकर यांचीही तिच परिस्थिती आहे. तेदेखील आधी कुठे होते आणि आता कुठे आहेत.

त्यांच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपाचे किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हे दिसून येईलच. सत्ताबदलापेक्षा त्यांनी आपले आमदार सांभाळावेत,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच महाविकास आघाडीचे १७० आमदार कायमच सोबत राहणार असल्याचेही पाटील म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version