दिल्ली मध्ये अपयश, आता झारखंड मध्ये ऑपरेशन लोटस?

दिल्ली, २९ ऑगस्ट २०२२ दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवालांनी सोमवारी विधानसभेच्या विशेष सत्रामध्ये विश्वास दर्शक ठराव सादर केला. दरम्यान आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकार वर जोरदार टीका केली आहे. दिल्ली सरकार पाडण्या साठी आम आदमी पार्टी च्या आमदाराला प्रत्येकी २०-२० कोटीची ऑफर दिली, पण भाजपने सुरू केलेले ऑपरेशन लोटस आत्ता अपयशी ठरले आहे. कारण आम आदमी पार्टी च्या एकाही आमदाराला ते विकत घेऊ शकले नाहीत. पण मी सांगतो पुढच्या १५ दिवसात झारखंड सरकार पडणार आहे. असा केजरीवाल यांनी आरोप केला आहे.

भाजप कडून १५ दिवसांच्या आत झारखंड मधील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी पहिल्यांदा तेलाच्या किंमती वाढवल्या. कारण मिळालेले पैसै झारखंडच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी वापरले जातील. भाजपचे ऑपरेशन लोटस दिल्ली मध्ये यशस्वी झाले नाही. पण झारखंड मध्ये झारखंड सरकार पाडण्या साठी खुप प्रयत्न केले जात आहेत.

दिल्ली विधानसभेमध्ये विश्वास दर्शक ठराव सादर केल्या नंतर केजरीवाल भाजपला ठणकावून उत्तर देत बोलतात की जर तुमच्यात हिम्मत असेल तर आम आदमी पार्टी च्या एका तरी आमदाराला खरेदी करून दाखवा. आमचे सगळे आमदार एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहेत. म्हणून तुमचं ऑपरेशन लोटस कधीही यशस्वी होणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा